गांधी आणि मार्क्स (पूर्वार्ध)
गांधी हे एक साम्राज्यवादविरोधी लढवय्ये होते, हे सर्वमान्य आहे. त्यांना कदाचित आजवरचे साम्राज्यवादविरुद्धचे सर्वश्रेष्ठ लढवय्ये म्हणता येईल. ते एक थोर साम्राज्यवादविरोधी विचारवंत होते, हे मात्र फारसे ध्यानात घेतले जात नाही. त्यांच्या मर्मग्राही मतांचे विस्तृत विश्लेषण स्वत: त्यांनी केले नाही, की मार्क्समध्ये आढळणाऱ्या वर्ग आणि वर्गसंघर्षाच्या संकल्पनांचे त्यांना आकर्षण वाटले नाही.......